शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

माधुरीच्या नव्या चित्रपटात आदित्य-मृणाल

marathi cinema
धकधक गर्ल पहिल्यांदाच मराठी चित्रपट निर्मितीमध्ये उतरलंय. यापूर्वी अजय देवगण, रितेश देशमुख, प्रियंका चौप्रा यासारख्या हिंदी कलाकरांनी मराठी चित्रपट बनवले आहेत. हिंदीतील कलाकरांनी बनवलेले मराठी चित्रपट बरेच गाजले आहेत. असे चित्रपट सर्व स्तरावरील प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवून बनवले जातात. माधुरीचा नवा चित्रपटदेखील दमदार असणार आहे. माधुरीने टि्वटरवर आपल्या पतीसोबतचा एक फोटो शेअर करीत नव्या चित्रपटाबद्दल भाष्ट केले आहे.
 
ती लिहिते चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत. हा एक मराठी मनोरंजक चित्रपट असेल आणि त्यासाठी आमच्याकडे तगडी टीम आहे. माधुरीच्या या नव्या चित्रपटात आदित्य कोठारे आणि मृणाल देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असतील. आदित्य, मृणालसोबत एक फोटोही तिने पोस्ट केलाय.