बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

तेजश्री प्रधान बनली RJ

होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली तेजश्री प्रधान सध्या आर.जे. बनली आहे. आता अॅक्टिंग सोडून तेजश्री आरजे कशी बनली असा प्रशन कदाचित तुम्हाला पडेल. असेही एकदा व्हावे या सिनेमातून तेजश्री आरजे च्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे.
 
झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित असेही एकदा व्हावे या आगामी सिनेमात ती रेडिओ जॉकीच्या भूमिकेतून तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच उमेश कामत आणि तेजश्री प्रधान ही जोडगोळी मोठ्या पडद्यावर एक‍त्र येत आहे. येत्या 6 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील भूमिकेसाठी तेजश्रीने खूप मेहनत घेतली असल्याचे समजते.
 
फोटो: सोशल मीडिया