शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

बुर्ज खलीफा रंगला तिरंग्याच्या रंगात

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्या दरम्यान संयुक्‍त अरब अमीरात पोहोचले.  त्यांच्या स्वागतासाठीरी प्रसिद्ध इमारतीवर भारतीय तिरंगांच्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफा तिरंग्याच्या रंगात आहे. शनिवार संध्याकाळी मोदी अबू धाबीला पोहोचणार आहेत. तेथे त्यांचं औपचारिक स्‍वागत होईल. यानंतर ते अबू धाबीमध्ये क्राउन प्रिंस शेख मोहम्‍मद बिन जायद अल नाह्यान यांची राष्‍ट्रपती भवनात भेट घेतील.
 
लष्कराचे डेप्युटी सुप्रीम कमांडर आणि अबू धाबीचे क्राउन प्रिंस पीएम मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यानंतर काही करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. रविवार पीएम मोदी दुबईमध्ये आयोजित वर्ल्‍ड गर्वंमेंट समिटमध्ये भाग घेतील. ज्यामध्ये भारत प्रमुख अतिथी आहे. पंतप्रधान मोदी तेथील पंतप्रधान आणि उपराष्‍ट्रपती शेख मोहम्‍मद बिन राशिद अल मकतूम यांची देखील भेट घेतील.