1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2017 (14:59 IST)

कॉल सेंटर प्रकरणाचा मास्टरमाईंडला पकडण्यात यश

cal centre

मुंबईतील मीरा रोड  बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा मास्टरमाईंड सागर ठक्कर उर्फ शॅगी याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला 13 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. या  प्रकरणी अमेरिकेनं 61 भारतीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 20 जणांना अमेरिकेतच अटक करण्यात आली आहे. मीरा रोड भागातील 7 बनावट कॉल सेंटर्सच्या माध्यमातून तब्बल 6 हजार 400 अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.देशात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचं सांगितलं जातं आहे.