शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (15:12 IST)

रशियात 60 वर्षांतली विक्रमी हिमवृष्टी

रशियात गेल्या 60 वर्षांतली विक्रमी हिमवृष्टी झाली असून यामुळे एका नागरिकाला प्राणास मुकावे लागले आहे तर अन्य पाच जखमी झाले आहेत. रस्त्यावरील बर्फ  बाजूला करण्यासाठी सेनेची मदत घेतली जात आहे. या हिमवृष्टीमुळे 850 विमान उड्डाणे स्थगित केली गेली आहेत. 
 
राजधानी मास्कोध्ये 2 हजार झाडे कोसळली आहेत. हिमवृष्टीचे प्रमाण वाढून ते 18.5 इंचावर गेल्याचे समजते. जानेवारीत यंदा रशियातील पारा उणे 62 अंशावर गेला होता. यामुळे घराबाहेर पडणार्‍या नागरिकांच्या डोळ्याच्या पापण्या व डोक्यावरही बर्फ जमत होते. यंदा येथे थंडीनेही विक्रम केला आहे. परिणामी सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळेला सुट्‌ट्या जाहीर केल्या गेल्या आहेत.