गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 1 मार्च 2018 (15:55 IST)

उमेश - तेजश्री म्हणत आहेत 'यू नो व्हॉट?'

umesh tejashree you know what
मराठी चित्रपटसृष्टीत आज नित्यनुतन प्रयोग घडत आहे. चित्रपटाचे विषय, संकलन, मांडणी आणि दिग्दर्शनाबरोबरच सिनेमातील संगीतातही आज विविध प्रयोग होताना दिसून येत आहे. चित्रपटाच्या कथानकाला बांधून ठेवण्यास महत्वपूर्ण असलेल्या या संगीताचे, एक वेगळेच रूप आपल्याला आगामी 'असेही एकदा व्हावे' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. झेलू इंटरटेंटमेंटस यांची निर्मिती आणि सुश्रुत भागवत यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील 'यू नो व्हॉट?' ही कविता अल्पावधीतच सोशल नेट्वर्किंगवर साईटवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ह्या प्रयत्नाने सिनेमातील पार्श्वसंगीताचा सुयोग्य वापर करत पार्षवसंगीताचे महत्व पटवून दिले आहे. उमेश कामत आणि तेजश्री प्रधानने म्हंटलेली हि कविता वैभव जोशी याने शब्दबद्ध केली असून, तिला अद्वैत पटवर्धनने अप्रतिम पार्श्वसंगीत दिले आहे.
 
'यू नो व्हॉट' या कवितेचे गाण्यात रुपांतर न करता, त्याचे बोल उमेश आणि तेजश्रीकडून वदवून घेण्याची किमया सुश्रुत भागवतने लीलया साधली आहे. विशेष म्हणजे, यात उमेश कामतने गिटारदेखील वाजवली असून, कवितेचा विचार करून अद्वैतकडून गिटार चे प्रशिक्षण त्याने घेतले. अद्वैत पटवर्धन ह्यानी कवितेला पार्श्वसंगीत देताना गिटार च्या कॉर्डस वापरताना अश्या वापरल्या आहेत की ज्या उमेश कामत ला स्क्रीन वर लिलया वाजवता येतील. याबद्दल सांगताना दिग्दर्शक सुश्रुत भागवत सांगतात की, 'या कवितेच्या चित्रिकरणादरम्यान अद्वैत पूर्णवेळ सेटवर उपस्थित होता. पार्श्वसंगीताचा हा एक वेगळाच प्रकार असून, ब्लॅक एंड व्हाईटमध्ये ती लोकांसमोर सादर करण्यात आली आहे'. उमेशच्या कल्पनेतली तेजश्री दाखवणारी हि कविता, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असून, अल्पावधीतच या कवितेने सोशल नेट्वर्किंग साईटवर तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात उमेश तेजश्री जोडीबरोबरच शर्वाणी पिल्लई हिचीदेखील विशेष भूमिका आहे.