शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू

मराठी सिनेसृष्टीतील बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा दुर्देवी मृत्यू झालाय. मालाडमध्ये रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झालाय.
 
झी मराठीवरील ‘कुंकू’मालिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झाले आहे. प्रफुल्लच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबासह मनोरंजन विश्वाला चटका बसला आहे.
 
सोमवारी पहाटे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये प्रफुल्ल कैलास भालेरावला प्राण गमवावे लागले. मुंबईत मालाडजवळ प्रफुल्लला अपघात झाल्याची माहिती आहे. झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या ‘कुंकू’मालिकेत त्याने जानकीचा भाऊ गण्याची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेमुळे प्रफुल्लचा चेहरा घराघरात पोहचला होता. कलर्स वाहिनीवरील ‘तू माझा सांगती’, आवाज- ज्योतिबा फुले, ‘स्टार प्रवाह’वरील नकुशी मालिकेतील त्याच्या भूमिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बारायण’मध्येही तो झळकला होता.