शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2018 (10:44 IST)

निखिल रानडे याचा आगामी "बेफिकर" म्युझिक सिंगल

तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी मराठी निर्माते, दिग्दर्शक आणि गायक नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. दुसरीकडे मराठीत येणाऱ्या गाण्यांमध्ये ग्लॅमर हळूहळू प्रवेश करतो आहे. मराठी गाण्यांच्या या ग्लॅमरमध्ये भर टाकण्यासाठी “बेफिकर” नावाचं मराठी म्युझिक सिंगल लवकरच येतं आहे. परदेशातील नयनरम्य लोकेशनमध्ये “बेफिकर” हे म्युझिक सिंगल शुट करण्यात आलं असून म्युझिक सिंगलच्या चाहत्यांसाठी एक नवी मेजवानी घेऊन येतं आहे. मराठी गाण्यांमध्ये हल्ली विविधता आढळते, पण परदेशात जाऊन एका मराठी गायकानं गाणं शुट करणे ही मोठी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाहीयं. पेक्षाने छायाचित्रकार असलेल्या निखिल रानडे याने आपला पार्श्वगायनाचा छंद जोपासत स्वतः परदेशात जाऊन “बेफिकर” या म्युझिक सिंगलचं शुट आणि निर्मिती केलीय. 
आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने आजच्या तरुणाईला भुरळ पाडणारा निखिल रानडे आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे. यापुर्वी निखिल याने “इशारा तुझा” म्युझिक सिंगलची निर्मिती केली होती, या म्युझिक सिंगलला तरुणांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. परदेशात पहिल्यांदाच चित्रित करण्यात आलेल्या मराठी "इशारा तुझा" या म्युझिक सिंगलमध्ये  निखिलने स्वतः अभिनेत्याची भूमिका पार पाडली होती. या म्युझिक सिंगल नंतर निखिलने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचे वेगळं स्थान निर्माण केलयं. सोबतच निखिलची निर्माता, दिग्दर्शक तसेच गायक म्हणून नवीन ओळख उद्यास आली. निखिल रानडे याने आपल्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत "झोका तुझा"," इशारा तुझा" या मराठी गाण्यांचे तर "जोगी" या हिंदी गाण्याचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली. निखिल याने आपल्या प्रत्येक गाण्यांमधून नवीन कलाकारांना संधी दिली,प्रत्येक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने कायम प्रयत्नशील असलेल्या निखिलचे येत्या वर्षी ३ विविध पठडीचे म्युझिक सिंगल आपल्या भेटीला येणार आहेत. निखिलने स्वरबद्ध केलेलं "बेफिकर" हा म्युझिक सिंगल लवकरच प्रदर्शित होणार असून पेपी ट्रॅक असलेलं हे गाणं तरुणाईला आपल्या तालावर ठेका धरायला भाग पाडणार आहे. अतुल जोशी यांनी शब्दबद्ध केलेल्या म्युझिक सिंगलमध्ये निहार शेंबेकर यांनी संगीतकाराची धुरा सांभाळली आहे. राजीव रानडे यांनी या सिंगलचे छायाचित्रण केलंय  शिवाय स्कॉटलंड येथील निसर्गरम्य स्थळांचे दर्शन आपल्याला या गाण्यात दिसणार आहे. "बेफिकर" या म्युझिक सिंगल नंतर निखिलचे "मन गुंतते" आणि "सांग ना" हे आगामी म्युझिक सिंगल्स लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत.