शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2018 (10:07 IST)

अभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

अभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. झी युवावरील ‘गुलमोहर ‘या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस अभिनेत्री गिरीजा ओक – गोडबोले हिच्यासोबत प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेय आणि गिरीजा हे दोघेही उत्तम कलाकार असून दोघांनीही यापूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, या दोघांनी एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गुलमोहर ही छोट्या छोट्या सुंदर हृदयस्पर्शी कथांवर आधारित मालिका आहे. ही मालिका २२ जानेवारीपासून सोमवार आणि मंगळवार रोज रात्री ९:३० वाजता झी युवावर पाहायला मिळेल.