1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

'बबन' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

बबन
'ख्वाडा' या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा आगामी बहुचर्चित व बहुप्रतीक्षित 'बबन' या मराठी चित्रपटाचा रोमान्स, अ‍ॅक्शन, टेरर, दोस्ती यांचा धमाकेदार पॅक असलेला ट्रेलर रिलीज झाला आहे. 
‘चित्रक्षा फिल्म्स’ प्रस्तुत ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ग्रामीण भागातील प्रेमकहाणी दाखवणारा हा चित्रपट येत्या 23 मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट वेगळा असून जसा ख्वाडा मध्ये वेगळा प्रयोग केला होता तसाच नवीन प्रयोग करणार आहे. या चित्रपटात नवीन अभिनेत्री असून तिने प्रथमच काम केले आहे. तर अनेक नवीन कलाकारांना यामध्ये संधी दिली गेली आहे.