1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

हा अभिनेता साकारतोय दहशतवाद्याची भूमिका

‘ओमेर्टा’या सिनेमात लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव चक्क एका कुख्यात दहशतवाद्याची भूमिका साकारत आहे. आपल्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेसाठी तो जीवतोड मेहनत करत असून त्याचे प्रशिक्षण घेत आहे. चश्मा आणि वाढवलेली दाढी असा राजकुमारचा लुक या सिनेमात पहायला मिळणार आहे.
 
सामान्य माणूस दहशतवादी कसा बनतो, याचा प्रवास ‘ओमेर्टा’या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्‍यापासून त्‍याला १६ मिलियन पेक्षाजास्त व्हुज मिळाले आहेत. दरम्यान, आपल्या या भूमिकेबद्दल राजकुमार अतिशय उत्साही असून आपली ही भूमिका देखील प्रेक्षकांना नक्की आवडेल, अशी आशा राजकुमार राव याने बोलून दाखवली आहे.