बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'ऑल अबाऊट सेक्शन ३७७' चा नवा ट्रेलर रिलीज

फोटोग्राफर अमित खन्नाची गाजलेली आणि अनेक पुरस्कार प्राप्त वेब सिरीज 'ऑल अबाऊट सेक्शन ३७७' च्या दुसऱ्या सीजनचा पहिला एपिसोड तयार झालाय. याचा ट्रेलरदेखील युट्यूबवर रिलीज केलाय.
 
लेखक, डिरेक्टर आणि प्रोड्यूसर अमित खन्ना हाच यामध्ये मुख्य भुमिकेत दिसतोय.ट्रांसजेंडरच्या मुद्द्यांना ही वेब सिरिज हात घालते. यामध्ये  गुलशन नैन, अंकित भाटिया, मुस्तफा शेख, यश योगी, गुंजन मल्होत्रा, अमित खन्नासोबत अनेक कलाकार दिसणार आहेत.
 
प्रेम हा एक सुंदर अनुभव आहे हे मोकळेपणाने करायला हवे. याला जेंडरच्या बंधनात ठेवायला नको. आमची सिरिज ३७७ वर आधारित आहे. ज्यामध्ये ट्रांसजेंडरचा मुद्दा घेतला आहे. त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते, गावातील लोक त्यांच्याबद्दल कसे विचार करतात या सर्वाची ही कहाणी आहे.