शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शिल्पा शिंदे ‘बिग बॉस’ ची विजेती

बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली. तर विजयाची प्रबळ दावेदार असणाऱ्या हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्या काही दिवसांमध्ये हिनाची शोमधील लोकप्रियता वाढली होती. मात्र, अंतिम फेरीत शिल्पा माँ उर्फ शिल्पा शिंदे हिने तिच्यावर सरशी साधली.
 
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या ११ व्या पर्वाचा विजेता कोण असणार या संदर्भात अनेक तर्क लढवले जात होते. या रिअॅलिटी शोची सुरूवात १९ स्पर्धकांनी झाली. अंतिम फेरीत विकास गुप्ता, शिल्पा शिंदे, हिना खान आणि पुनीश शर्मा हे चार स्पर्धक दाखल झाले होते.