गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 15 जानेवारी 2018 (13:06 IST)

'पद्मावत'च्या प्रदर्शनाचा मुहुर्त अखेर ठरला!

padmavati new tailor release
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' सिनेमाची अधिकृत तारीख निश्चित करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती देत हा सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. 
 
हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. सेन्सॉर बोर्डाने पाच बदलांसह सिनोला यू/ए सर्टिफिकेट दिले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना हा सिनेमा पाहता येणार नाही.  'पद्मावत' हा देशातला पहिला सिनेमा आहे जो आयमॅक्स 3डी हिंदीध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानुसार, निर्मात्यांना सिनेमाचे नाव बदलण्यास सांगण्यात आले होते. यानंतरच निर्मात्यांनी 'पद्मावती' हे नाव बदलून 'पद्मावत' केले.