1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2018 (09:13 IST)

विनोदी 'वेलकम टू न्यूयॉर्क'चे ट्रेलर लॉन्च

welcome-to-new-york-trailer-released

करण जोहर बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे. 'वेलकम टू न्यूयॉर्क' या हिंदी कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख, लारा दत्ता, राणा दग्गुभत्ती, सुशांतसिंग राजपूत, सोनाक्षी सिन्हा, बमन इराणी, करण जोहर अशी भली मोठी स्टारकास्ट आहे. 
'वेलकम टू न्यूयॉर्क' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट निखळ मनोरंजन करणार ठरणार  आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात शोले चित्रपटातील गब्बरच्या डायलॉगने होते. लारा दत्ता या चित्रपटामध्ये मॅनेजमेंट कंपनीची प्रमुख असते. ती 'आयफा' सोहळ्याचे आयोजन करते. या शोमध्ये 'करण जोहर' डबल रोलमध्ये दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा फॅशन डिझायनरच्या भूमिकेत आहे.