बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2018 (11:41 IST)

लक्षवेधी ठरत आहे 'आपला मानूस' चा ट्रेलर

अजय देवगण निर्मित आपला मानूस या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.  या ट्रेलर मध्ये शहरात राहणाऱ्या आणि शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या राहुल आणि भक्ती गोखले या तरुण जोडप्याची कथा मांडली असून या भूमिका साकारल्या आहेत,अनुक्रमे सुमित राघवन आणि ईरावती हर्षे यांनी तसेच यात वडीलांबरोबरच्या नात्यातील गुंतागुंत सुध्दा दाखविलेली आहे.वडीलांच्या अनपेक्षित मृत्युमुळे त्यांच्या जीवनात मारुती नागरगोजे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो.ही भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे.

सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहे.नाना पाटेकर,सुमित राघवन आणि ईरावती हर्षे या कलाकारांसह नुकत्याच झालेल्या एका समारंभात निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला.