रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मे 2018 (11:27 IST)

लोक माझ्याविषयी काय बोलतात याचे देणे-घेणे नाही

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा हिने नुकतेच वजन कमी केले आहे. यासाठी चाहत्यांकडून तिचे कौतुकही केले जात आहे. मात्र काहींनी तिच्यावर टीकेची झोड उठविली आहे. याविषयी परिणितीने म्हटले की, 'लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचे मला काहीही देणे-घेणे नाही.' परिणितीने म्हटले की, तुम्ही प्रत्येकवेळी यावर लक्ष देऊ शकत नाही की, लोक तुमच्याविषयी काय बोलत आहेत. जर तुम्ही केवळ याचाच विचार केला तर तुम्ही मोठ्या संकटात सापडाल. सर्व काही चांगले घडत आहे, असा सकारात्मक विचार करून आरोग्य सुदृढ ठेवायला हवे. कारण प्रत्येकासाठी सुदृढ स्वास्थ्य खूप महत्त्वाचे आहे.
 
परिणितीने म्हटले की, 'तुम्ही असे काम करायला हवे जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. मी एका खास अंदाजातच दिसावे असा माझ्यावर कुठलाही दबाव नाही. मी केवळ सुदृढ राहू इच्छिते. त्याचबरोबर सुखी आणि संपूर्ण जीवन जगू इच्छिते. स्विमयिर ब्रॅण्ड स्पीडोइंडियाने नुकतेच परिणितीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली. यावेळी परिणितीला स्वास्थ्यचा अर्थ बदलण्यावरून प्रश्र्न विचारला असता, तिने म्हटले की, स्वास्थ्यचा अर्थ पूर्णपणे स्वतःला आवाहन देणे असा होतो. प्रत्येक दिवशी, प्रत्येक प्रशिक्षण सत्रात मी तुम्हाला व्यस्त ठेवले नाही किंवा रोमांचित केले नाही तर तुम्हाला कंटाळा येण्यास सुरुवात होईल. मी नेहमीच काही तरी नवे करण्याचा शोध घेत असते. जेणेकरून दररोज आपल्या शारीरिक क्षमतेत वाढ होऊ शकेल.