सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 5 मे 2018 (12:37 IST)

एक्स बॉयफ्रेंडलाही दिले लग्नाचे निमंत्रण

सध्या कपूर परिवारात अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्राची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 8 मे रोजी सोनम बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत साताजन्माच्या गाठी बांधणार आहे. दरम्यान, सध्या कपूर परिवाराकडून या शाही विवाहात सहभागी होणार्‍या पाहुणे मंडळींची यादी तयार केली जात आहे. त्यामध्ये अभिनेता रणबीर कपूरच्या नावाचाही समावेश आहे. जेव्हा सोनमने 2007 मध्ये आलेल्या 'सांवरिया' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती, तेव्हा तिचे नाव अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडले गेले होते.
 
त्यावेळी दोघांच्या प्रेमाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र चित्रपट अपयशी झाल्यामुळे रणबीर आणि सोनमचे नातेही संपुष्टात आले. त्यानंतर एका मुलाखतीत सोनमने रणबीरबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले होते. सोनम करण जोहरच्या शोमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत पोहोचली होती. तेव्हा सोनमने म्हटले होते की, रणबीर बॉयफ्रेंड  मटीरियल नाही. त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहणे खूप अवघड आहे. यावेळी सोनमने रणबीर कपूरला मम्माज बॉय असेही म्हटले होते. सोनमच्या या वक्तव्यानंतर रणबीरने तिला ड्रामा क्वीन असे म्हटले होते.
 
दरम्यान, एक काळ असाही होता जेव्हा सोनम, रणबीरचे कौतुक करताना अजिबातच थांबत नव्हती. तिने म्हटले होते की, रणबीर असा मुलगा आहे, ज्याला प्रत्येक मुलगी आपला बॉयफ्रेंड बनवू इच्छिते. दरम्यान, या वादानंतरही सोनने रणबीरला तिच्या लग्नाचे निमंत्रण दिल्याची बातमी समोर येत आहे. रणबीर व्यतिरिक्त सोनम कपूरचे नाव दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा याच्याशीही जोडले गेले आहे. पुनीतने सोनमला 'आय हेट लव स्टोरीज' या चित्रपटात संधी दिली होती. मात्र दोघांनी कधीही त्यांच्यातील नात्याचा जाहीरपणे खुलासा केला नव्हता.