मंगळवार, 11 मार्च 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

फराह खानच्या पायाला फ्रॅक्चर

बॉलिवूड नृत्यदिग्दर्शिका फराह खानच्या पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुखापतीमुळे ती पुढील काही आठवडे तरी हालचाल करु शकणार नाही अशी माहिती स्वत: फराहने दिली आहे.

पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे डॉक्टरांनीही तिला पुढील तीन आठवडे व्हिलचेअर वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तीन आठवडे तरी ती हालचाल करु शकणार नाही हे निश्चित. फराहने या घटनेची माहिती देत तिच्या व्हिलचेअरचा फोटोही पोस्ट केला आहे. सोनमच्या संगीत समारंभामध्ये फराहवर महिलांना नृत्य शिकविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.