राजपाल यादवला ६ महिन्याची शिक्षा, जामीन
विनोदी अभिनेता राजपाल यादवला कोर्टाने ६ महिन्याची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीच्या कडकडडुमा कोर्टाने एका चेक न वठल्याच्या प्रकरणी सुनावणी केली, त्यात राजपालला ही शिक्षा सुनावली. या प्रकरणी राजपालला जामीन ही मिळालाय.
राजपाल यादव, त्यांची पत्नी आणि एका कंपनीला एका कर्ज प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणाच्या शिक्षेची सुनावणी झाली .राजपाल आणि राधा यादव यांनी २०१० मध्ये दिल्लीतील एम जी अग्रवाल यांच्याकडून कर्ज घेतलं होतं, अग्रवाल हे व्यावसायिक आहेत.
अता पता लापता या चित्रपटासाठी राजपालने कर्ज घेतलं होतं. राजपाल यादव यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला हा पहिलाच सिनेमा होता. मात्र या सिनेमासाठी घेतलेले पैस राजपाल यादवला परत करता आले नाहीत, त्यामुळे राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीविरोधात तक्रार दाखल झाली. राजपाल यादव याला २०१३ मध्ये याच प्रकरणात १० दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली होती.