1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध

bollywood news
गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. अंकिता मिलिंदला सोडून गेली अशा खबर सर्वत्र पसरली होती. मात्र या सर्व अफवांवर दोघांनी न बोलता उत्तर दिले. दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटोज शेअर केले. त्यावरुन या दोघांचे सर्व आलबेल असून अलिबागमध्ये विवाहबद्ध  झाले आहेत. त्यामुळे आता मात्र या सर्व चर्चांना पू्र्णविराम लागला आहे. 
 
लग्न करण्यापूर्वी मिलिंदने अंकिताच्या पालकांची भेट घेतली. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता अंकितासोबत मिलिंद त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. हे मिलिंदचे दुसरे लग्न असून यापूर्वी त्याने फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoi सोबत विवाह केला होता. मात्र ३ वर्षातच ते विभक्त झाले.