संबंधित माहिती
- 'बँकॉक' तस्करी मॉड्यूलचा पर्दाफाश, मुंबई कस्टम्सने कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक तस्करी मॉड्यूल जप्त केले, ६ तस्करांना अटक
- धुळे येथे विषारी पदार्थ सेवन केल्याने आई आणि मुलाचा मृत्यू
- रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज!
- शिवनेरी किल्ल्यावर प्रचंड गर्दी, एक भाविक घसरला ज्यामुळे इतर जण पायऱ्यांवर पडले; पोलीस म्हणाले- चेंगराचेंगरी झाली नाही
- गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; ४४ नक्षल स्मारके पाडली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरी किल्ल्यावर रितेश विलासराव देशमुख यांची विशेष भेट
शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा आणि मानाची मानवंदना! स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी, अवघा महाराष्ट्र शिवमय झाला आहे. याच मंगल दिनाचे औचित्य साधून, लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट दिली.
तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील किल्ले शिवनेरीवर उपस्थित राहून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. महाराजांच्या चरणी नतमस्तक होत, त्यांनी रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करत, अभिवादन केले.
Edited By- Dhanashri Naik
