सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 एप्रिल 2018 (16:23 IST)

मिलिंद सोमणचा साखरपुडा झाला ?

वयाच्या 52 व्या वर्षी मिलिंद सोमण लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आपल्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने साखरपुडा केला आहे. मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अंकिताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात अंगठी दिसत आहे. त्यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, मिलिंद आणि अंकिताने साखरपुडा केला आहे. तसेच यात तिने मिलिंदचा हात पकडला आहे आणि तिच्या बोटात एन्गेज्डमेंट रिंग स्पष्ट दिसतेय. हा फोटो पाहून मिलिंद व अंकिताने साखरपुडा केल्याचा अंदाज बांधला जात आहे.
 
मिलिंद सोमण याचं वय 52 वर्षे असून त्याच्या पेक्षा अगदी अर्ध्या वयाची अंकिता कोनवार आहे. अंकिता गुवाहाटी येथे राहणारी आहे. अंकिता अंदाजे वय 23-24 वर्षे असू शकेल. अंकिताला हिंदी, बांगला, आसामी तसेच फ्रेंच आणि इंग्रजी इतक्या भाषा येतात. तिला सिनेमा पाहणे आणि स्विमिंग करणं अत्यंत आवडतं.