मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 9 एप्रिल 2018 (14:00 IST)

काश्मीरमध्ये विवाह बंधनात अडकले IAS टॉपर टीना आणि अतहर आमिर

साल 2015मध्ये यूपीएससी टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर शनिवारी लग्नाच्या बंधनात अडकले. या जोड्याने आपले लग्न काश्मीरच्या पहलगाम येथे केले. सांगायचे म्हणजे अतहर आमिर काश्मीरचाच राहणारा आहे. 2015 मध्ये अतहर आमिर सेकेंड टॉपर होता.  
 
वृत्तानुसार टीना डाबी आपल्या कुटुंबीयांसोबत शुक्रवारी पहलगाम येथे पोहोचली होती. टीना आणि अतहर   आयएएसच्या ट्रेनिंगदरम्यान प्रेमात पडले होते.  
 
टीनाने आपल्या लग्नाची बातमी आधीच दिली होती, दोघांनी फेसबुकवर एक फोटो देखील शेअर केला होता. पण त्या वेळेस लग्नाची तारीख नक्की सांगण्यात आली नव्हती.