नाना आणि अनिल 'वेलकम 3' साठी सज्ज
वेलकम या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूरच्या जोडीने धमाल केली आहे. या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. या दोघांचा हा चित्रपट यशस्वी होण्यामागे बराच मोठा वाटा आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार बदलले गेले परंतु नाना आणि अनिलची जोडी वेलकम टू मध्ये देखील पाहायला मिळाली. तर आता लवकरच वेलकम 3 येत असून या चित्रपटातदेखील ही जोडगोळी कॉमेडीचा तडका लावायला सज्ज झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला 'वेलकम 3' हा चित्रपट फ्लोअरवर येण्याची शक्यता आहे. चित्रपटात अनिल कपूर, नाना पाटेकर आणि परेश रावल दिसणार आहेत. अनीस बज्मी यांनी वेलकमच्या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार तिसर्या पार्टचे दिग्दर्शन कोणी नवा दिग्दर्शक करणार आहे. तिसर्या भागात कॉमेडीसोबत अॅक्शनसुद्धा दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाची शूटिंग न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. अनिल कपूर नुकताच 'रेस3'चे शूटिंग संपवून आबुधाबीवरुन परतला आहे.