बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

वीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये करिना, सोनम, स्वरा आणि शिखा यांचा मजेदार अंदाज पाहायला मिळतो.  करिना आणि सोनमचा बोल्ड अंदाजही पाहायला मिळत आहे. या सिनेमातून चार मैत्रिणींच्या बॉडींगचे दर्शन होणार आहे. सिनेमात वेब सिरीज परमनेंट रुममेट्स फेम सुमित व्यासही आहे.  
 
सिनेमा १ जूनला प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला १८ मे ला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र एकताने ट्वीट करुन सांगितले की, १ जून हा एक मोठा दिवस आहे. वीरे दी वेडींग हा सिनेमा लक्ष्यच्या वाढदिवसा दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेव्हा लग्न आणि वाढदिवसाचे सर्वांना निमंत्रण आहे. गेल्या वर्षी सिनेमाचे दोन पोस्टर्स प्रदर्शित झाले. या सिनेमाचे शूटिंग मुंबई, दिल्ली आणि फुकेतमध्ये झाले आहे.