मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मे 2018 (09:32 IST)

ट्विटरकडून युजर्सना लगेच पासवर्ड बदलण्याचे आवाहन

सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यासपीठ असलेल्या ट्विटरने आपल्या युजर्सना लगेच पासवर्ड बदलण्याचे आवाहन  केले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रकीह जारी करण्यात आले आहे. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने 33 कोटी युजर्सला ट्विटरने  पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉगमध्ये बग आढळल्याने ट्विटरने यूजर्सना पासवर्ड बदलण्यासाठी सांगितलं आहे.

दरम्यान, आतपर्यंत एकाही ट्विटर अकाऊंटचा गैरवापर झाल्याची तक्रार ट्विटर वेबसाईटकडे आलेली नाही. मात्र, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून यूजर्सनी ट्विटरचा स्टोअर्ड पासवर्ड बदलावा असं सांगण्यात आलं आहे. ट्विटरने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन यासंबंधीचं ट्वीट केलं आहे.