बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 मे 2017 (08:38 IST)

पुणे : पोलिसांकडून सुमारे 100 कोटीचे एमडी ड्रग जप्त

पुण्यात छापेमारी करुन आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे  यांच्या नेतृत्वात पोलिसांनी सुमारे 100 कोटी रुपयांचं एमडी ड्रग जप्त केले आहे. कुरकुम एमआयडीसीतील एक फॅक्टरीमध्ये कोट्यवधी रुपयांचं एमडी ड्रग तयार केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबईतील मानखुर्दमध्ये डोरजी नावाच्या एका व्यक्तीला पकडल्यानंतर यासंबंधी सुगावा लागला होता. त्यानंतर शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वात पुण्यात छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत साधारण 100 कोटीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. एमआयडीसीमध्ये केमिकलच्या नावाखाली ड्रग्ज तयार केलं जात असल्याची माहिती आहे. हे ड्रग्ज तरुणांपर्यंत पोहोचवलं जात होते.