गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 मे 2018 (10:39 IST)

यामुळे ट्विंकल झाली ट्रोल

रुस्तम या चित्रपटात अभिनेता अक्षयकुमारने घातलेल्या गणवेशाचा तो लिलाव करणार आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम अक्षय एका स्वयंसेवी संस्थेला देणार आहे. या लिलावावरून वाद निर्माण झाला आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल हिला ट्रोल करण्यात येत आहे. 
 
या चित्रपटात अक्षयने पोशाख परिधान केला होता, गणवेश नाही. झटपट पैसे कमावण्यासाठी आणि चित्रपटात परिधान केलेला गणवेश हा काही फक्त कापडाचा तुकडा नाही. सैन्यदल, नौदल आणि हवाई दलाच्या अधिकाऱयांच्या पत्नी त्यांच्या पतीच्या गणवेशाचा लिलाव करीत नाहीत. राष्ट्रपतींच्या कार्यालयातून गणवेश वापरण्याची परवानगी मिळते. अतोनात परिश्रमातून हा गणवेश कमावला जातो, असे लेफ्टनंट कर्नल संदीप अहलावत यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं. टीका करत धमकी देणाऱया अहलवात यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा ट्विंकलने दिला आहे.