बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बेजान दारूवाला यांना ब्रेन स्टोकचा तीव्र झटका

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना सल्ला देणार्‍या बेजान दारूवाला यांना ब्रेन स्टोकचा तीव्र झटका आला आहे. बेजान दारूवाला यांनी फेसबूक पोस्ट्च्या माध्यामातून त्यांना ब्रेनस्टोकचा झटका आल्याची माहिती शेअर केली आहे. त्यांना एक दिवस व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

इतक्या गंभीर झटक्यातून सही सलामत बाहेर पडणं ही किमया आहे असे डॉक्टरांचं मत असल्याची माहिती त्यांनी शेअर केली आहे. चाहत्यांच्या प्रेमामुळे, शुभार्शिवादामुळे मी बचावले. गणेशाची माझ्यावर कृपा आहे. त्यामुळे लवकरच या आजारातून बाहेर पडेन असेही दारूवाला यांनी म्हटले आहे.  आता बेजान दारूवाला यांच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी म्हणून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.