बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 एप्रिल 2018 (15:16 IST)

म्हणे, डायना हेडनचे सौंदर्य मला समजलेले नाही

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी आता माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेय. तिला मिळालेल्या मुकुट हा फिक्स होता, असे विधान करुन वाद ओढवून घेतलाय. तर ऐश्वर्या राय-बच्चन हिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.
 
डायनाला २१ वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या मिस वर्ल्डच्या विजेतेपदावर बिप्लब देव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. ही सौंदर्य स्पर्धा बोगस होती. तिला देण्यात आलेला मुकुट हा 'फिक्स' होता. मात्र ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याचे देव यांनी कौतुक केलेय. ऐश्वर्या खऱ्या अर्थाने भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते, असे त्यांनी म्हटलेय. आम्ही भारतीय महिलांना लक्ष्मी, सरस्वतीच्या रूपात पाहतो. ऐश्वर्या राय भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते. डायना मिस वर्ल्ड बनली, हे ठीक आहे, पण डायना हेडनचे सौंदर्य मला समजलेले नाही, असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.