मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (10:53 IST)

सलमान - ऐश्वर्या यांचे चित्रपट आमनेसामने

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या यांचे चित्रपट आता आमनेसामने आले आहेत. 
सलमानने ‘रेस 3’ चित्रपटासाठी 2018 मधली ईद राखून ठेवली आहे. 15 जून 2018 रोजी रेस 3 प्रदर्शित होणार आहे. परंतु सलमानची एक्स गर्लफ्रेण्ड अर्थात ऐश्वर्या राय बच्चनचा ‘फॅनी खान’ही त्याच दिवशी प्रदर्शित होण्याची चिन्हं आहेत.

2002 मधल्या ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांपासून अंतर राखलं होतं, मात्र आता एकाच दिवशी दोघांचे सिनेमे रीलिज होत असल्यामुळे चर्चा आतापासून चर्चा सुरु झाली आहे. 

फॅनी खानमध्ये ऐश्वर्यासोबत अनिल कपूर झळकणार आहे. निर्मात्यांनी दोघांसोबत चर्चा करुनच रीलिजची तारीख निश्चित केली. सणासुदीला चित्रपट प्रदर्शित होत असल्याने दोघंही खुशच होते. अनिल साकारत असलेली फॅनी खान ही व्यक्तिरेखा मुस्लिम असल्यामुळे ईदशिवाय दुसरा चांगला मुहूर्त असूच शकत नाही, असं निर्मात्यांनी सांगितलं.