मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'पद्मावती'चे नवीन पोस्टर

संजय लीला भंसाळी यांचा बहुप्रतिक्षित 'पद्मावती' हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. आता एक नवीन पोस्टर आले आहे. नव्या पोस्टरवर दीपिकाचा लूक अनेकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. पण त्यासोबतच तारीख  पाहून अनेक चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. 

दीपिकाच्या नव्या पोस्टरवर ३० नोव्हेंबर तारीख असल्याने हा चित्रपट प्री पोन करणार असेल का?  असा प्रश्न अनेकांना आला. पद्मावती हा जगभर रिलीज होत आहे. त्यानुसार गल्फ भागात चित्रपट गुरूवारी रिलीज करण्याची प्रथा आहे. त्यामुळे तेथील पोस्टरवर गुरूवार म्हणजे ३० तारीख प्रिंट करण्यात आली आहे. त्यामुळे हा गोंधळ झाला आहे.