बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

कृती- सुशांतची गुपचूप भेट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांच्यात प्रेम बहरत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड वर्तुळात रंगताना दिसत आहेत. ही जोडी राबता या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला मात्र त्यानंतर ही जोडी चांगलीच चर्चेत आली. दोघे अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. अलीकडेच कृतीला पुन्हा एकदा सुशांतच्या घराजवळ पाहिले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.
 
डेक्कन क्रॉनिकल या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कृतीने सुशांतच्या घरापासून काही अंतरावर तिची कार पार्क केली. प्रसारमाध्यमांपासून लांब राहण्यासाठीच तिने असे केले असावे. सुशांतच्या घरी जवळपास ती दोन तास होती. फोटोग्राफर्सच्या नजरेत येऊ नये याची तिने पुरेपूर काळजी घेतली होती.