बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमानने कुत्र्यांची माफी मागितली

सलमान खानला अचानक आठवलं की त्याने कुत्र्यांचा अपमान केला आहे मग काय, बिग बॉसच्या मंचावर त्याने सर्व कुत्र्यांची माफी मागितली. 
 
खरं म्हणजे काही दिवसांपूर्वी बिग बॉस या स्पर्धेत सलमानने एका स्पर्धकासाठी कुत्रा असे उद्बोधन केले होते. आता कोणाला म्हटले होते हे सर्वांच माहित आहे. नंतर सलमानला माफी मागण्याची इच्छा झाली. बिग बॉसच्या मंचावर येऊन त्याने म्हटले की मी माफी मागू इच्छित आहे. सर्वांना वाटले की तो त्या स्पर्धकांची माफी मागू इच्छित आहेत पण सलमान म्हणाला, मी कुत्र्यांचा अपमान केला आहे. 
 
एका वाहियात स्पर्धकाची तुलना मी कुत्र्यांशी केली म्हणून कुत्र्यांचा अपमान झाला आणि मी कुत्र्यांची माफी मागतो. कुत्रे खरंच खूप वफादार असतात आणि कोणत्याही अटीशिवाय आपल्यावर प्रेम करतात.