मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

तुसाद संग्रहालयमध्ये आशा भोसलेंची मूर्ती

आपल्या आवाजाच्या जादूने श्रोतांना मोहित करणारी गायिका आशा भोसले यांचा मेणाचा पुतळा दिल्ली येथे मॅडम तुसाद संग्रहालयात लावण्यात आला आहे. स्वत: आशा भोसले यांनी आपल्या प्रतिमेचा अनावरण केले.
 
या प्रसंगी आशा ताई म्हणाल्या की त्या मेहनत आणि लगनने इतकी जिवंत प्रतिमा तयार करणार्‍या कलाकारांप्रती आभारी आहेत. त्यांनी संग्रहालयातील लोकांना त्यांची प्रतिमा लावण्यासाठी धन्यवाद दिले.
 
आशा ताई म्हणाल्या की त्यांच्या प्रेमळ श्रोत्यांच्या समर्थनामुळे ही प्रतिमा लागली असून त्यांना दर्शकांचा प्रतिसाद जाणून घेण्याचीही उत्सुकता आहे. या प्रतिमेत आशा भोसले गात असलेल्या मुद्रेत दिसत आहे. संग्रहालय 1 डिसेंबरला दर्शकांसाठी उघडण्यात येईल.