बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

एकता कपूर आणि सनीचे फिस्कटले

पॉर्नस्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओन आता बॉलीवूडची बेबी डॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सनी लिओनीने बघता बघता मनोरंजन विश्वासत आपले वेगळे स्थान निर्माण केले. पूजा भट्टच्या जिस्म 2 चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असले तरी एकता कपूरच्या रागिनी एमएमएस 2 चित्रपटानेच तिला खरी ओळख मिळाली.
 
तिचे यातील बेबी डॉल हे गाणे खूपच गाजले होते. एकता आणि सनीमध्ये तेव्हापासून मैत्री झाली. एकता कपूर सध्या आपल्या आगामी रागिनी एमएमएस रिटर्न्स या वेब ‍सीरिजच्या लाँचवर लक्ष देत आहे. दरम्यान, सनीने या वेब सीरिजमध्ये कोणत्याही प्रकारे काम करावे, अशी अपेक्षा तिची होती. वेब सीरिजशी तिचे नाव प्रसिद्धी कार्यक्रम किंवा पाहुणी कलाकार म्हणून का होईना, जोडले जावे असे एकताला वाटत होते. पण एकताला सनीने नकार दिल्यामुळे एकता चांगलीच रागावली आहे.
 
सनीमुळे इव्हेंटमध्ये जरा ग्लॅमर येईल असा एकताचा विचार होता. पण काही वैयक्तिक कामे असल्यामुळे सनीने यावेळी आपल्या मैत्रिणीची मदत करू शकत नसल्याचे कळते. नुकतीच लॉस एं‍जेलिसला सनी गेली असून तिथे ती स्वत:च्या निर्मितीसंस्थेवर काम करत असल्यामुळे ती दोन महिने व्यस्त असणार आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकताला सनीच्या निर्णयामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला. सनीच्या करिअरमधील रागिनी एमएमएस 2 हा महत्त्वाकांक्षी चित्रपट होता. तिने एकताबद्दल असलेल्या निष्ठेप्रती तरी निदान स्वत:चे काम बाजूला ठेवायला हवे होते.