मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (10:07 IST)

शाहरुख खान आणि आनंद एल राय यांच्या सिनेमाचे नामकरण “बटला’

shahrukh khan new film batla
शाहरूख खान आणि फिल्ममेकर आनंद एल राय यांच्या सिनेमाची बरीच चर्चा झाली. सिनेमाचे शूटिंगही सुरू आहे. पण नाव काही ठरत नव्हते. शेवटी एकदाचे या सिनेमाचे नामकरण झाले. ते आहे ‘बटला’. किंग खान या सिनेमात बुटक्‍या माणसाची भूमिका करतोय. म्हणून सिनेमाचं नाव आहे “बटला’. हा बटला म्हणजे पूर्वी हिमगौरी आणि 7 बुटक्‍यांच्या कथेतला बुटका असणार आहे. त्याच्या जवळ काही खास शक्तीही असणार आहे. पूर्वी जेंव्हा “अप्पू राजा’मध्ये कमल हासनने बुटक्‍याचा रोल केला होता,
 
तेंव्हा त्याने पाय गुडघ्यातून दुमडून घेतले होते. मात्र शाहरुखसाठी मात्र ग्राफिक टेक्‍नोलॉजी वापरली जाणार आहे. त्याच्या या रोलबद्दल आणि लुकबद्दल आताच उत्सुकता निर्माण व्हायला लागली आहे. सिनेमात अनुष्का शर्मा आणि कतरिनाही आहेत. या तिघांनी “जब तक है जान’मध्ये एकत्र काम केले आहे. या सिनेमात सलमान खान गेस्ट म्हणून आहे. मध्यंतरी त्याचे शूटही पूर्ण झाले आहे.