1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. dangal

‘दंगल'ची हाँगकाँगमध्ये विक्रमी कमाई

‘दंगल’ या चित्रपटाने हाँगकाँगमध्ये २३.४५ मिलियन हाँगकाँग डॉलर्सची कमाई केली असून, भारतीय रुपयानुसार हा आकडा २० कोटींच्या घरात जात आहे. हाँगकाँगमध्ये विक्रमी करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत ‘दंगल’ पहिला ठरला आहे.

आमिरच्याच ‘३ इडियट्स’ या चित्रपटाचा विक्रम ‘दंगल’ने मोडीत काढला आहे. हाँगकाँगमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ५.२ हाँगकाँग डॉलर्सची कमाई केली होती. याआधी आमिर खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटाने हाँगकाँगमध्ये २३.४२ मिलियन हाँगकाँग डॉलर्सची कमाई केली होती.

पुढील लेख
पारायण....... ( संसाराचे)