मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दबंग-3 मध्ये मुन्नी मलाइका

बॉलीवूड अभिने‍ता अरबाज खान याने आपल्या आगामी दबंग-3 चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू केली आहे. याची पुढील वर्षी जानेवारीत सुरूवात होण्याची संभावना आहे. चित्रपटातील एक गोष्ट निश्चित झाली आहे ती म्हणजे चित्रपटात पुन्हा एकदा सुपरस्टार सलमान खान चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसेल.
 
चित्रपटात चुलबुलशिवाय अन्य एक भूमिका प्रेक्षकांना आवडली ती म्हणजे मुन्नी अर्थातच मलाइका अरोरा खान. अरबाज आणि मलाइका यांचे ब्रेकअप झाल्यानंतर अनेकांना वाटले की या चित्रपटात मलाइकाला काम मिळणार नाही मात्र, अरबाजच्या मनात काही वेगळेच आहे. अरबाजला वाटते की मलाइकाशिवाय अन्य कोणतीही अभिनेत्री या भूमिकेसाठी पात्र नाही.
 
दबंग आण दबंग-2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार्‍या पुढील सीरिजमध्ये मलाइकाची भूमिका जवळ-जवळ निश्चित मानली जात आहे. दरम्यान, अरबाज खानने त्याचा आ‍गामी चित्रपट तेरा इंतजारच्या ट्रेलर लॉन्चदरम्यान दबंग-3 बद्दल घोषणा केली. चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. 2018 च्या मध्यावधीत चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होईलल असे अरबाज खान म्हणाला आहे.