मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'टायगर जिंदा है' चा पाहिला लूक रिलीज

सलमान खानने ट्विटरच्या माध्यामातून 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचा पाहिला लूक चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल 'टायगर जिंदा है' यंदाच्या ख्रिस्मसला रसिकांच्या भेटीला येणार आहे.  'टायगर जिंदा है' या चित्रपटातून बर्‍याच वर्षांनी सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही रोमॅंटिक जोडी पदद्यावर पाहायला मिळणार आहे.  त्यामुळे सलमान- कॅटरिनाच्या फॅन्समध्ये या चित्रपटाबाबत फारच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली आहे.