1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (11:40 IST)

प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘दबंग ३’

dabangg 3 is comming
सलमान खानचा चित्रपट ‘दबंग’ आणि ‘दबंग-2’ नं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. यानंतर आता ‘दबंग-3’ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दबंग चित्रपटाचा निर्माता अरबाज खानने ही माहिती दिली आहे. पुढच्या वर्षी २०१८ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

अरबाज खानने त्याचा आगामी चित्रपट तेरा इंतजारच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान ‘दबंग-३’ बद्दल घोषणा केली. चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. २०१८ च्या मध्यावधीत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल, असे अरबाज खान म्हणाला आहे.