बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमानच्या घरगुती गणेशोत्सवाची प्रथा होणार खंडित!

सलमान खान आणि त्याचं कुटुंबीय दरवर्षी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. पण यंदा 14 वर्षांमध्ये पहिल्यांदा ब्रांद्रे येथील गॅलॅक्सी अपाटमेंटऐवजी खान कुटुंबीय त्यांच्या घरातील शेंडेफळ म्हणेज अर्पिता खान शर्मा हिच्या घरी गणेशोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. गेल्यावर्षी सलमान खान 'टूयुबलाईट' चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्याने मुंबईत गणेशोत्सवात सहभागी होऊ शकला नव्हता. पण यंदा 'टायगर जिंदा है' या चित्रपटासाठीचे अबुधाबीमध्ये सुरू असलेले चित्रीकरण आटपून सलमान 25 ऑगस्टला मुंबईत परतणार आहे.

सलमान केवळ एकच दिवस मुंबईत असेल त्यानंतर पुन्हा ‍तो चित्रीकरणासाठी परतणार आहे. टायगर जिंदा है चित्रपटानंतर सलमान खान कडे अजून 2-3 चित्रपट आहेत. त्यापैकी रेस 3 चं चित्रीकरण सुरू केले जाईल.