बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2017 (16:09 IST)

आता रविवारी ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’

सोनी टीव्हीने  या रविवारी कपिल शर्माचा शो वगळण्यात आला असून त्याच्या ऐवजी सुनील ग्रोव्हरचा ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा शो ऑन एअर जाणार आहे. सोनी टीव्हीने या शोचे अनेक प्रोमो जारी केले आहेत, ज्यामध्ये येत्या रविवारी हा शो ऑन एअर असल्याचं सांगितलं आहे. अभिनेता सलमान खानचा सिनेमा ‘ट्युबलाईट’च्या प्रमोशनसाठी या शोचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे ‘ट्युबलाईट’च्या निमित्ताने छोट्या पडद्यावर मोठा बदल करण्यात आला आहे.‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा दोन तासांचा महाएपिसोड असणार आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी ‘द कपिल शर्मा शो’ दाखवला जातो. मात्र त्याऐवजी या रविवारी ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा शो दाखवला जाणार आहे. या शोमध्ये सलमानसोबत त्याचा भाऊ आणि निर्माता अरबाज खानही दिसणार आहे. त्यांच्यासोबत काही बालकलाकारही दिसतील.