'द फॅमिली मॅन ३' चा टीझर प्रदर्शित, मनोज बाजपेयी पुन्हा एकदा नवीन मोहिमेवर परतणार
अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन सीझन ३' ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तसेच आता नुकताच त्याचा पहिला टीझर प्रदर्शित झाला. तो पाहून आता चाहते या मालिकेबद्दल अधिक उत्सुक झाले आहे.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर, 'द फॅमिली मॅन' च्या चाहत्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मनोज बाजपेयी अभिनीत या लोकप्रिय स्पाय-थ्रिलर मालिकेचा तिसरा सीझन लवकरच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
अलीकडेच ५८ सेकंदांचा टीझर प्रदर्शित झाला आहे, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर, 'द फॅमिली मॅन ३' मध्ये पुन्हा एकदा श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज वाजपेयी केंद्रस्थानी आहे. तसेच टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला.
Edited By- Dhanashri Naik