गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘ट्युबलाईट’ चे टीझर रिलीज

सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ चित्रपटाचे टीझर रिलीज झाले आहे. 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. सिनेमात सलमान खानची भूमिका अत्यंत साध्या-सरळ तरुणाची असेल, असं टीझरवरुन लक्षात येतं. सोहेल खानही सैन्याच्या गणवेशात दिसतो आणि त्याला मिठी मारुन सलमान रडतो आहे, असाही एक सीन आहे. ‘ट्युबलाईट’मध्ये सलमान खान, सोहेल खान आणि चायनिज अभिनेत्री झू झू मुख्य भूमिकेत आहेत. सलमा खान आणि सलमान खान यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. कबीर खानने ‘ट्युबलाईट’चंही दिग्दर्शन केले आहे. यंदा ईदच्या दिवशी सलमानचा ट्युबलाईट’ सिनेमा रिलीज होणार आहे.