शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राहुल गांधी मोठ्या संकटातून बचावले, घातपाताचा संशय

दिल्लीहून कर्नाटकच्या हुबळी येथे जाताना  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेलिकॉप्टर अपघात होण्या पासून थोडक्यात बचावले आहे. हेलिकॉप्टर उडाल्यावर त्यात बिघाड असल्याचं लक्षात आलं त्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. मात्र या घटनेत  राहुलजी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अनेकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.  
 
सकाळी ९ वाजता हेलिकॉप्टर निघणार  होते आणि  ११ वाजून ४५ मिनिटांनी विमान हुबळीत पोहोचणार होते. मात्र, पावणे अकराच्या सुमारास आकाशात असतानाच हेलिकॉप्टर हेलकावे खायला लागलं, विमान एका बाजूला झुकले आणि खाली आले.  हेलिकॉप्टर एका भागातून विचित्र आवाज येत होता. याशिवाय हेलिकॉप्टर ‘ऑटोपायलट मोड’ काम करत नव्हतं. हवामान सामान्य असतानाही असा प्रकार घडल्याने सगळेच चक्रावून गेले.  हुबळी विमानतळावर हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी तीन वेळेस प्रयत्न करण्यात आला, तिस-या प्रयत्नात हेलिकॉप्टर उतरवण्यात यश आलं.  हेलिकॉप्टर लॅण्ड करताना वातावरणही स्वच्छ होतं. त्यामुळे हेलिकॉप्टर अचानक हेलकावे का घेऊ लागलं? असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.