शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नोकरीसाठी वडिलांना गोळी झाडली

पाटणा- नोकरी मिळविण्यासाठी तरुण प्रयत्न करत असतात परंतू वडिलांच्या जागेवर नोकरी मिळावी म्हणून वडिलांना मार्गातून हटवण्याचा विचार खरोखर धक्कादायक आहे.
 
बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात वडिलांना गोळी झाडून हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात मुलाला अटक करण्यात आली आहे.
 
वडिलांच्या जागी रेल्वेत नोकरी मिळविण्यासाठी मुलानेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात घडली आहे. वडिलांना गोळी मारून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. मुलाने सुपारी दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट किलरलाही अटक करण्यात आली आहे. पवनने दोन कॉन्ट्रॅक्ट किलरला 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती.
 
ओम प्रकाश मंडल यांच्यावर त्यांच्या ऑफिसमध्ये गोळी झाडण्यात आली. गोळी त्यांच्या खांद्यावर लागली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी रवी रंजन याला अटक केली आहे. चौकशीनंतर पोलिसांना पूर्ण परिस्थिती कळून आली.
 
ओम प्रकाश मंडल 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार होते. वडिलांची नोकरी मिळावी यासाठी मुलाने वडिलांच्याच हत्येचा कट रचला.