मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अटल बिहारी वाजपेयींचे नाव मतदार यादीतून हटवले

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव लखनऊ महानगरपालिकेने मतदार यादीतून हटवलं आहे. त्यामुळे यापुढे होणा-या कोणत्याही निवडणुकांमध्ये ते मतदान करु शकणार नाहीत. अनेक वर्षांपासून लखनऊमध्ये न आल्यामुळे त्यांचं नाव मतदार यादीतून हटवण्यात आलं आहे. 
 
मतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षण मोहिमेनंतर त्यांचं नाव यादीतून काढून टाकण्यात आल्याचं क्षेत्रीय अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी स्पष्ट केलं. वाजपेयी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील बनारसी दास वॉर्डमधून मतदानाचा हक्क बजावायचे. त्यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. मात्र त्यानंतर प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.