बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बिहार-झारखंड शोधत आहेत ब्लू-व्हेल गेम

ज्या खेळाने देशात आणि जगात दहशत माजवली आहे तो ब्लू व्हेल गेम आपल्या भारतात दोन राज्य या गेमला जोरदार शोधात आहेत. गुगलच्या रिपोर्ट नुसार आपल्या देशात हा गेम खूप मोबाईल युझर्स शोधात आहेत यामध्ये सर्वाधिक असे बिहार-झारखंड या गेमचा शोध घेत आहेत. हा गेम काय आहे कसा असतो तर हा खेळ कसा खेळला जातो या करिता अनेक लोक हे गुगल सर्च वर शोधात असतात. नेमका हा खेळ खेळून काय होते ? कोण आहे या खेळा मागे असे अनेक प्रश्न बिहारी गुगुल ला विचारत आहेत.
 
गुगलने आपल्या अहवालामध्ये सांगितले आहे की  गेम सर्च करणर्‍यांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचेही स्‍पष्ट केले आहे. 
 
गुगलवर गेल्या तीन महिन्‍यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक नागरिकांनी हा गेम सर्च केला आाहे. झारखंड आणि बिहारमध्ये या गेमबाबत विचारणा करणार्‍यांची संख्या मोठी आहे.  ब्लू गेम सर्च करणारे झारखंड हे पाचव्या स्‍थानावरचे राज्य आहे. गुगलच्या रिपोर्ट नंतर तरी नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे. तर सरकारने या विरोधात काहीतरी पावले उचलेने गरजेचे होणार आहे.